दोन न्यूज चॅनेल्सविरोधात बॉलिवूडची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. घराणेशाही, गटबाजी त्यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणामुळे सुशांतच्या चाहत्यांनी समस्त बॉलिवूडला धारेवर धरलं. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी बॉलिवूडची प्रतिमा मलिन करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे बेजबाबदार बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनेल्सविरोधात बॉलिवूडच्या ३८ प्रॉडक्शन हाऊसने दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. यामध्ये बॉलिवूडचे तीन खान म्हणजेच अभिनेता शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान देखील सामिल आहे. 

याप्रकरणी दिल्लीतील कोर्टात दोन न्यूज चॅनल्स आणि ४ अँकर्सविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये  रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेजबाबदार बातम्या प्रसिद्ध करून यांनी बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, असं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: