लोकल, जीम तूर्तास बंदच, आरे मध्ये मेट्रो कारशेड नाहीच – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 11 –  महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अनलॉकची घोषणा करत अनेक उद्योग  आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. पण, अजूनही मंदिर, लोकल रेल्वे सेवा, जीम हे बंद आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कधी अनलॉक होणार याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुर्तास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरे कारशेड, कोरोनाची परिस्थिती आणि मंदिर उघडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

‘लॉकडाउनमध्ये बंद पडलेले अनेक उद्योग आपण एक एक करून सुरू करत आहोत. हळूहळू सर्व उद्योग धंदे सुरू करण्यात येणार आहे. पण कोविडबद्दल आपल्या सर्वांना आता काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जबाबदारी आपली आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘दारूची दुकानं उघडली पण मंदिरं का उघडली जात नाही, अशी विचारणा विरोधकांकडून  केली जात आहे. विरोधकांना विचारयला काय जाते. पण, ही जबाबदारी आमच्यावर आहे. आमचं लोकांवर प्रेम आहे. त्यामुळे निर्णय घेतले नाही’, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

‘एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच संख्या कमी होत चालली आहे. व्हेंटिलेटर आता उपलब्ध होत आहे. पण  कोरोना हा पसरत चाललेला आहे.  कोरोनाचे रुग्ण आता ग्रामीण भागात वाढत चालले आहे.  काही जणांना कोरोना होऊन गेला असेल. तर काही जणांना सौम्य लक्षणे जाणवत आहे. पण, मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी संघर्षमय ठरत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे’, असंही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

‘लॉकडाउनच्या काळात सर्व धर्मियांनी सण हे खबरदारी घेऊन साजरे केले आहे. आता नवरात्र, दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे हळूहळू आपण दारं उघडत आहोत. उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे, नाहीतर  कोरोना आला तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

‘मला पण गर्दी नकोय पण मास्क हाच आपला ब्लॅकबेल्ट आहे. आपल्या सर्वांना मास्क हा वापरणे बंधनकारकच आहे’, असं म्हणत त्यांनी लोकल सुरू करण्याबद्दल नकार दिला आहे.

‘आम्ही जे करू जनतेच्या हितासाठी करू, जो काही कायदा आला आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या संघटना आणि लोकांशी बोलणे सुरू आहे. त्यानंतरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. आला कायदा आणि केली अंमलबाजवणी असं होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी कृषी कायद्याबद्दल स्पष्ट केले आहे.

आरेमध्ये कारशेड होणार नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीड वाजता राज्याच्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी महत्वाची घोषणा आरे कारशेड कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. आरे कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे सरकारने मागे घेतले आहे. 

– आरेचे कारशेड आता कांजूरमार्ग इथं होणार
– १०० कोटी रूपये आरेत खर्च झालेत, ते वाया जावू देणार नाही
– कांजूर जागेसाठी १ रूपया खर्च होणार नाही
– मेट्रो 3 आणि मेट्रो 6 चा मार्गावरील एक समान मार्ग असेल, कांजूरमार्ग कार शेडसाठी

Leave a Reply

%d bloggers like this: