IPL 2020 – ख्रिस गेल रुग्णालयात; पंजाबच्या अडचणीत भर

दुबई, -: आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ निराशाजनक कामगिरी करत आहे. शनिवारी कोलकाता विरुद्ध झालेला सामना पंजाब जिंकणार असे वाटत असताना त्यांचा केवळ 2 धावांनी पराभव झाला. पंजाबने 7 पैकी 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. यातच संघाचा मुख्य फलंदाज ख्रिस गेलनं एकही सामना खेळलेला नाही आहे. दरम्यान, गेलला संघात का संधी मिळत नाही आहे, याचे कारण समोर आले आहे. गेलला अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ख्रिस गेलनं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही आहे. याआधी संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी गेलला फूड पॉयझन झाल्याचे सांगितले होते. आता गेलनं स्वत: हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला आहे.

गेलनं फोटो शेअर करताना, “मी तुम्हाला सांगतो की संघर्ष केल्याशिवाय मी माघार घेत नाही. मी युनिव्हर्सल बॉस आहे. ते कधीही बदलू शकत नाही. आपण माझ्याकडून शिकू शकता मात्र मी तो नाही आहे ज्याच्या सगळ्या गोष्टींचे तुम्ही अनुसरण करू शकता. आपली स्टाइल विसरू नका”, असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, गेल पुन्हा कधी पुनरागमन करणार याबाबत अद्याप माहिती नाही आहे. प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही याबाबत माहिती दिली नाही आहे. दुसरीकडे कोलकात्याविरुद्धच्या या पराभवासोबतच पंजाबचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 7 मॅचपैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे, तर उरलेल्या 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्येही पंजाबची टीम आठव्या क्रमांकावर आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: