पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘स्वामित्व योजने’ची सुरुवात

नवी दिल्ली, दि. 11  ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘स्वामित्व’ योजनेची घोषणा केली. या योजनेमुळे लाभार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मजबुती मिळाली आहे. या योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिण्यात आलं. लाभार्थ्यांना हे कार्ड आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही लिंक मिळणार आहे. जे ‘संपत्ती कार्ड’ डाऊनलोड करू शकतात. 

या योजनेतंर्गत ६ राज्याच्या ७६३ गावातील गावकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे ३४६ गावे, हरियाणाचे २२१ गावे, महाराष्ट्रातील १००गावे, मध्य प्रदेशचे ४४ गावे, उत्तराखंडचे ५० गावे आणि कर्नाटकच्या २ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील लाभार्थींना एका दिवसांत फिजिकल कार्ड मिळणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ एप्रिल म्हणजेच राष्ट्रीय पंचायत दिनी ‘स्वामित्व’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गावात राहणाऱ्या नागरिकांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयेगी पडणार असून जागेवरील मालकीहक्कांबाबतचे वाद संपुष्टात येतील. असं मोदी म्हणाले.

शिवाय, या योजमुळे गावात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. एक कायदेशीर दस्तावेज म्हणून ‘संपत्ती कार्ड’चा वापर करता येणार आहे. या योजनेत दिल्या जाणाऱ्या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.

ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर टीका केली. याआधी सत्तेत असलेल्या पक्षाने मोठी-मोठी आश्वासनं जनतेला दिली. परंतू त्यांच्या वाट्याला कायम निराशा आली. मात्र आता ‘स्वामित्व’ योजनेमुळे ते आत्मनिर्भर होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: