व्यावसायिक आभ्यासक्रमच्या प्रवेशा बाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा -असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इंस्टीट्युट ची मागणी

पुणे. दि. 9 – कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक आभ्यासक्रमच्या प्रवेशा बाबत महाराष्ट्र सरकारने लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये ,अशी मागणी असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इंस्टीट्युट या संघटनेने केली आहे.

हि संघटना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षण संस्थानचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करते.

२०२०-२१ च्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी शिवाय प्रवेश अथवा कॅप राउंड संपल्यानंतर समुपदेशक फेरी संपल्यानंतर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.

महाराष्ट्र शासनाने प्रवेश पात्रता पदवी अभियांत्रिकीसाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद प्रमाणे करावी आणि पदवी फार्मसी व फार्म डी साठी सर्वोच्च शिखर संस्था अखिल भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदे प्रमाणे करावी.

सीईटी सेल राबवत असलेल्या तंत्र शिक्षणाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश फेऱ्या संपल्यानंतर समुपदेशक फेरी घ्यावी
महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक कायदा २०१५ मुळे राज्यातील शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी हा कायदा रद्द करावा,या मागण्या संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आल्या आहेत.
या पत्रकार परिषदेला संघटनेचे राजीव जगताप ,प्राध्यापक राम
दास झोळ आणि विविध शैक्षणिक संस्थाचे कायदेशीर सल्लागार दिलीप जगताप उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: