पुणे विभाग – 3 लाख 95 हजार 123 कोरोना बाधित रुग्ण बरे;
विभागात कोरोना बाधित 4 लाख 64 हजार 774 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.9 :- पुणे विभागातील 3 लाख 95 हजार 123 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 64 हजार 774 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 160 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 491 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.01 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 1 हजार 392 रुग्णांपैकी 2 लाख 61 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 32 हजार 910 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 917 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.79 टक्के आहे.


सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 636 रुग्णांपैकी 32 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 122 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा


सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 39 रुग्णांपैकी 29 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 739 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 330 रुग्णांपैकी 33 हजार 784 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 59 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 377 रुग्णांपैकी 38 हजार 522 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 330 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 267 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 39, सातारा जिल्ह्यात 441, सोलापूर जिल्ह्यात 314, सांगली जिल्ह्यात 361 तर कोल्हापूर जिल्ह्यात 112 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 897 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 707, सातारा जिल्हयामध्ये 455, सोलापूर जिल्हयामध्ये 382, सांगली जिल्हयामध्ये 424 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 929 अशा रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 66 हजार 170 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 64 हजार 774 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 8 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

%d bloggers like this: