आता घरबसल्या करा वंध्यत्वावरील उपचार

ओएसिस फर्टिलिटी तर्फे वंध्यत्वावरील उपचाराची सेवा आयव्हीएफ ऍट होम आता घरपोच उपलब्ध

पुणे, दि. ९- अनावश्यक कामांसाठी सोडा, डाॅक्टरांकडे जाण्यासारख्या महत्त्वाच्या कामाच्या वेळीही घराबाहेर पडताना दहावेळा विचार करावा लागतो अशी परिस्थिती सध्या पुण्यातील कोव्हिड-१९ प्रादुर्भावामुळे निर्माण झाली आहे… त्यामुळे अनेकजण डाॅक्टरांकडील चेकअप असो किंवा नियोजित शस्त्रक्रिया सगळं काही पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत.. पण तुम्ही जर व्यंध्यत्वावरील उपचार घेत असाल तर आता तो विचार आणि उपचार पुढे ढकलण्याची गरज नाही. आता तुम्हाला घरबसल्या व्यंध्यत्वावरील उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. ओएसिस फर्टिलिटीतर्फे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ओएसिस फर्टिलिटीचे वैद्यकीय संचालक आणि सह-संस्थापक डाॅ. दुर्गा जी राव म्हणाले, कोव्हिडचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. तसेच ते तणावाखालीसुद्धा आहेत. त्यामुळे आम्ही एका नावीन्यपूर्ण संकल्पनेच्या आधारे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) या व्यंध्यत्वावरील उपचार पद्धतीची सेवा आता घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे.

भारतामध्ये सहापैकी एका दांपत्याला व्यंध्यत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. व्यंध्यत्वावरील उपचार घेण्यात जेवढा उशीर होत जातो तेवढी स्त्रीची प्रजननक्षमता क्षीण होत जाते. त्यामुळे व्यंध्यत्वावरील उपचारांमध्ये काही महिन्यांचा उशीरसुद्धा काही जोडप्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो, असेही राव यांनी सांगितले.

ओएसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेडडाॅ निलेश बलकवडे म्हणाले, कोव्हिडची काळजी न करता आपल्या घरामध्ये सुरक्षित राहून दांपत्यांना आई-वडील होण्याची संधी आयव्हीएफ अॅट होम या सेवेमुळे मिळत आहे. ही सेवा देण्याचा विचार करताना वैद्यकीय संकेत व नियमांचे पूर्णतः पालन होईल याकडे आम्ही विशेष लक्ष दिले आहे. स्टिम्युलेशन, माॅनिटरिंग, इन्जेक्शन ही सर्व प्रक्रिया पेशंटच्या घरी केली जात असली तरी बिजांडाची निवड आणि भ्रूण हस्तांतरणाची प्रक्रिया ही क्लिनिकमध्येच केली जाते.

ओएसिस फर्टिलिटीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक किरण गडेला म्हणाले, आयव्हीएफ अॅट होम ही सेवा देताना आम्ही कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण (एसओपी) केले आहे. प्रत्येक पेशंटसाठी एक नर्सिग मॅनेजरची नेमणूक करण्यात आली असून उपचारासंबंधी सर्व माहिती, समन्वय ठेवणे त्याचे काम असते. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने व्हर्च्युअल कन्सलटेशनच्या माध्यमातून सर्व उपचारांवर देखरेख ठेवली जाते. नर्समार्फत पेशंटच्या घरीच इन्जेक्शन व अन्य प्रक्रिया केली जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: