काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास शेतकरी विरोधी तीनही कायदे रद्द करणार – राहुल गांधी

मोगा(पंजाब), दि. 4 – केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकांविरोधात काँग्रेसने आता रणशिंग फुंकलं आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने तीन नवी कृषी विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. या विरोधा काँग्रेसने देशभर आंदोलन सुरू केलंय. पंजाबामधल्या मोगा इथं काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसं सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले तीनही कायदे रद्द करू अशी घोषणा त्यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने कायम शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली आहे. मोदी सरकारने नवे कायदे करून शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या दावणीला बांधले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वातंत्र हिरावले जाणार आहे. शेतकऱ्यांची जमीन हिसकविण्यासाठीच केंद्राने हे कायदे केले असून काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हे कायदे कचऱ्याच्या डब्ब्यात टाकून दिले जातील असंही ते म्हणाले. भाजपपासून फारकत घेत अकाली दलाने या विधेयकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पंजाब मध्ये मुख्य पक्ष असलेले काँग्रेस आणि अकाली दल हे या विधेयकाच्या विरोधात असून आंदोलन सुरू केलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: