Thursday, June 11, 2026
NATIONAL

बिहार निवडणूक – भाजपला धक्का; NDA मधून लोक जनशक्ती बाहेर

नवी दिल्ली –  बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच NDA ला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार नसल्याचं पक्षाने ठरविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

लोक जनशक्ती पक्ष NDAमधून बाहेर पडला तरीही त्या पक्षाने भाजपची साथ सोडलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपशी संबंध कायम राहणार असल्याचं पासवान यांच्यावतीने सांगण्यात आलं आहे. पासवान यांनी राज्यात भाजप आणि लोकजनशक्तीचं सरकार आणू असंही म्हटलं आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून जेडीयू आणि पासवान यांच्या पक्षात मतभेद झाल्याने पासवान यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यात जास्त जागांची मागणी केली होती. तर नितिश कुमार हे तेवढ्या जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे पासवान यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading