माँडेलीझ इंडिया लिव्ह-इन पार्टनर्सनाही देणार ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीचे लाभ

माँडेलीझ इंडियाने आज आपल्या समूह मेडिक्लेम पॉलिसीचा विस्तार करत ती लिव्हइन पार्टनर्सना देत असल्याचे जाहीर केले. या सुविधेचे सध्याचे वैविध्य  समावेशकता आणखी वाढवण्याच्या उद्दिष्टाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. जानेवारी २०२१ पासून लागू होणारी ही नवीन पॉलिसी डोमेस्टिक जोडीदाराच्या दत्तक तसेच अवलंबून असलेल्‍या मुलांनाही संरक्षण पुरवेल. आपल्या अनेक पिढ्यांतील मनुष्यबळासाठी अधिक वैविध्यपूर्ण, समावेशक  न्याय्य जग निर्माण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. अशा सक्षम करणाऱ्या पॉलिसींच्या माध्यमातून कंपनी यासाठी प्रयत्न करत आहे. सामाजिक बदलांशी जुळवून घेण्याच्या तसेच उत्क्रांतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला समलिंगी जोडप्यांनाही ग्रुप मेडिक्लेम सुविधा देण्यास सुरुवात केली.

माँडेलीझ इंटरनॅशनलचे अध्यक्ष (भारत) दीपक अय्यर पॉलिसीच्या या नवीन विस्ताराबद्दल म्हणाले, “माँडेलीझ इंडियामध्ये आम्ही एक वैविध्यपूर्ण  समावेशक कार्यस्थळ संस्कृती विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही संस्कृती सहकाऱ्यांना आपले व्यक्तित्व जपून पूर्ण क्षमतेने काम करण्याचे सामर्थ्य देते. आमच्या उत्क्रांत मनुष्यबळाला स्वातंत्र्य  सामर्थ्य देण्यासाठी आम्ही त्यांच्या बदलत्या गरजांबाबत सातत्याने विचार करत असतो. आमच्या ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीचा विस्तार करून त्यात लिव्हइन पार्टनर्सना सामावून घेण्याचा निर्णय याच प्रयत्नांचा पुरावा आहे. आमचे सहकारी, कार्यसंस्कृती  समुदायासोबतची दीर्घकालीन वचनबद्धता उत्तम व्यावसायिक कामगिरी साध्य करण्यात उपयुक्त ठरते असे आम्हाला वाटते. स्नॅकिंगच्या भविष्यकाळाचे नेतृत्व करत असताना, आमचे मूळ उद्दिष्ट साध्य करणेही यामुळेच शक्य होणार आहे.”

माँडेलीझ इंडियाच्या मनुष्यबळ संचालक महालक्ष्मी आर. म्हणाल्या, माँडेलीझ इंडियामध्ये आमच्या प्रत्येक धोरणाच्या केंद्रस्थानी वैविध्य  समावेशकतेला स्थान दिले जाते. आज आमच्या ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीचा विस्तार करून डोमेस्टिक जोडीदाराच्या दत्तक  अवलंबून मुलांसह लिव्हइन पार्टनर्सनाही संरक्षण देत आम्ही आणखी एक प्रगतीशील पाऊल उचलले आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. या वर्षाच्या सुरुवातीला समलिंगी जोडीदारांसाठी अशाच प्रकारे पॉलिसीची फेररचना केल्यानंतर आता ही घोषणा आम्ही करत आहोत. यामुळे आमच्या सहकाऱ्यांना त्यांच्या खऱ्या सत्त्वावर काम करण्यास आणि प्रत्येकाच्या वैविध्यपूर्ण दृष्टिकोनाचा आदर ठेवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. #MAKEITUniquelyYours.”  

१९८०च्या दशकात उदारमतवादाचे वारे वाहू लागण्यापूर्वीच लिंगविविधता धोरण स्वीकारणाऱ्या काही मोजक्या कंपन्यांमध्ये माँडेलीझ इंडियाचा समावेश होतो आणि ही कंपनी आजही बदल  समानतेसाटी काम करत आहे. पॉलिसी लाभांचा विस्तार करणे ही गेल्या वर्षातील सुधारणांची मालिका आहे. माँडेलीझ इंडिया प्रथमच फॅमिली फ्लोटर मॉडेलवर गेली आणि त्यांनी लाभांचे छत्र सहकाऱ्यांना देऊ केले. यामुळे कंपनीची वैविध्यपूर्ण  समावेशक संस्कृती अधिक दृढ झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: