शहरातील नाट्य गृह -थिएटर सुरू करावेत या मागणीसाठी पुण्यातील सर्व कलाकारांच्या संस्था एकत्र
पुणे, दि. 28 – कोरोनाच्या धर्तीवर पुण्यातील लावणी , लोकधारा , ऑर्केस्ट्रा , नाटय – चित्रपट ,एकपात्री , नृत्य , साउंड – इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन पुणे तील सर्व संस्था प्रमुखांची फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महत्वाची बैठक पार पडली.

कोरोनाच्या काळात कलाकारांनी बिकट परिस्थितीतीशी सामना सामर्थ्याने करत असताना या संकटातवर कस मात करू शकतो यावर सखोल चर्चा झाली , लवकरच शहरातील नाट्य गृह -थिएटर सुरू करावेत ही आग्रही मागणी करण्यात आली आहे , साउंड च्या उद्योगांना मोठा फटका बसला असून त्यातून गणपती मिरवणुका रद्द झाल्याच्या पाश्वभूमीवर मंडपातील साउंड 10 दिवस लावण्याची परवानगी द्यावी अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली , गणपती उत्सवात कलाकारांनी सुरक्षतेचे काळजी घ्यावून कार्यक्रम सादर करावेत , 200 लोकांच्या सुरक्षतेची काळजी घेऊन थिएटर उपलब्ध करून दयावे 1 तारखेपर्यंत नाट्यगृह सुरू न झाल्यास मुखमंत्री मा.उद्धव ठाकरे , पालकमंत्री अजितदादा पवार , महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार असल्याचे सांगितले ,या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराजराजे भोसले , संवाद पुणे चे सुनीलजी महाजन , इंम्पा चे माणिकभाई बजाज , साउंड इलेक्टिकल जनरेटर असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी , उपाध्यक्ष शैलेश गायकवाड , गायक जितेंद्र भुरूक , गायक विवेक पंड्या , गायक – मकरंद पाटणकर , पंचम चे आनंद घोगरे , आम्ही एकपात्री चे राजेश शिंगाडे , गायक प्रशांत साळवी , महा अँकर्स असोसिएशनचे योगेश सुपेकर नागन्ना झलकी ,रियाझ शेख उपस्थित होते प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांनी आयोजन केले.
