Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

वहितीत आसलेल्या बौद्धाच्या गायरान जमिनी पोटखराब कश्या – किरण घोंगडे

जिंतूर, दि. २८ – बौद्ध मागासवर्गीय यांच्या ताब्यात आसलेल्या गायरान जमीनी वहितीत आसताना महसुल प्रशासनाने पोटखराब(लागवड अयोग्य) सातबारा नोंद केल्याने शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळत नसल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर नायब तहसिलदार सोनवने यांना निवेदन दिले.

प्रसिद्धी पत्रकात नमुद केले कि बौद्ध मागासवर्गीय यांच्या ताब्यात तिन पिढ्या पासुन ताब्यात आहे, बौद्ध,आदिवासी यांना उपजिविका करण्यासाठी गायरान पट्टे वाटप करण्यात आली व ते कसून आपला उदरनिर्वाह करतात आज रोजी 7/12 उपलब्ध आहे परंतु महसूल विभागाने 7/12 वरती लागवड अयोग्य(पोटखराब) अशी चुकिची नोंद केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक बँका पीक विमा, पीक कर्ज, व इतर योजनेचा लाभ देण्यासाठी अडचण निर्माण करत आहेत.
तेंव्हा सर्व शेतजमीनी ह्या वहितीत आसुनसुद्धा महसूल विभागाने चुकीची नोंद केली कसी अशा प्रश्न घोंगडे यांनी उपस्थित केला. महसूल प्रशासनाने शेत पाहनी करुन चूकीने घेतलेली पोटखराब नोंद रद्द करुन त्याठिकाणी लागवड क्षेत्र असी नोंद करावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा ईशारा जिल्हाप्रमुख किरणभाऊ घोंगडे यांनी दिला या वेळी जिंतूर तालुका अध्यक्ष शरदराव चव्हाण,प्रितमभैया वाकळे,आकाश सुतारे, लिंबाजी लहाडे,उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading