Monday, October 26, 2026
PUNE

पुणे विभाग- 54 हजार 459 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; विभागात 92 हजार 65 रुग्ण

पुणे दि. 28 :- पुणे विभागातील 54 हजार 459 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 92 हजार 65 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 109 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 140 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.15 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील 74 हजार 649 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 45 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 59 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 221, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 309 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 108, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 915 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.40 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 342 रुग्ण असून 1 हजार 798 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 431 आहे. कोरोनाबाधित एकूण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार 679 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 464 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 757 आहे. कोरोना बाधित एकूण 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 1 हजार 653 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 140 आहे. कोरोना बाधित एकूण 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 4 हजार 742 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 900 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 722 आहे. कोरोना बाधित एकूण 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 913 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 149, सातारा जिल्ह्यात 139, सोलापूर जिल्ह्यात 296, सांगली जिल्ह्यात 80 तर कोल्हापूर जिल्ह्यात 249 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 54 हजार 269 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 50 हजार 341 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 928 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 57 हजार 433 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading