Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENT

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी महेश भट्ट आणि कंगणाची चौकशी होणार

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे अजूनही मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी दिग्दर्शक, निर्माते महेश भट यांचीही चौकशी केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी आतापर्यंत 37 जणांची चौकशी करण्यात आली आहे. दिग्दर्शक, निर्माते महेश भट, कंगणा रनौत यांचीही चौकशी होईल. तसेच करण जोहरचे मॅनेजर यांचीही चौकशे केली जाईल. गरज पडल्यास करण जोहरलाही पोलीस बोलवतील असेही देशमुख यांनी नमूद केले.

सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर, महेश भट, सलमान खान खूप ट्रोल झाले होते. पहिल्यांदाच तपासात महेश भट आणि करण जोहर यांचे नाव आले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी यापूर्वी निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, चित्रपट समीक्षक राजीव मसंद आणि यशराजच्या एका टॅलेंट मॅनेजरची चौकशी झाली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading