Wednesday, September 2, 2026
MAHARASHTRA

भटक्या कुत्र्यावर लैंगिग अत्याचार करणाऱ्या विकृत इसमाला अटक

मुंबई, दि. २६ – एका विकृत इसमाकडून भटक्या कुत्र्यावर लैंगिग अत्याचार करण्यात येत असल्याची विचित्र घटना ठाण्यातील एका स्कायवॉकवर घडल्याचं समोर आलं आहे. मुक्या प्राण्यांवर या प्रकारे अत्याचार करून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी ४० वर्षीय विकृतावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट, जुना पासपोर्ट कार्यालयाजवळ असणाऱ्या स्कायवॉकवर दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी एक इसम भटक्या कुत्र्यावर लैंगिग अत्याचार करीत होता. हा विचित्र प्रकार त्याच परिसरात राहणारे सागर गुप्ता यांनी बघितला. गुप्ता यांनी ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेऊन या विकृत इसमाच्या ताब्यातून पीडित कुत्र्याची सुटका केली, परंतु आरोपी हा गुप्ता यांच्या तावडीतून निसटला.

सागर गुप्ता यांनी या विचित्र घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. श्रीनगर पोलिसांनी अनैसर्गिक कृत्य, तसेच प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून या विकृताचा शोध घेऊन दुसऱ्या दिवशी हजुरी गाव वागळे इस्टेट येथे राहणार ४० वर्षीय विजय चाळके या विकृत इसमाला अटक केली आहे. यापूर्वी देखील त्याने अनेक भटक्या कुत्र्यांबरोबर या प्रकारचे कृत्य केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading