आता बाईकवर मागच्या प्रवाशासाठीही हॅण्डल लावावे लागणार
केंद्र सरकारकडून नवी नियमावली
नवी दिल्ली, दि. 25 – बाईकवर मागे बसणाऱया प्रवाशासाठीही आता हॅन्डल लावावे लागणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून दुचाकींसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली. त्यात सहप्रवाशाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

बाईक चालवणाऱयाच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठी हॅण्डल असणे आवश्यक करण्यात आले आहे. परंतु अनेक बाईक्समध्ये अशा पद्धतीची सुविधा नाही. मात्र या नियमावलीमुळे भविष्यात बाईक्समध्ये तशी सुविधा कंपन्यांना द्यावी लागणार आहे.
असे आहेत नियम
– बाईकवर दोन्ही बाजूंनी पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य.
– मागे बसणाऱया व्यक्तीचे कपडे चाकात अडकू नयेत म्हणून मागच्या टायरचा अर्धा भाग सुरक्षितरित्या झाकावा.
– बाईकमध्ये हलका कंटेनर लावावा. त्याची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिनी आणि उंची 500 मिमीपेक्षा जास्त नसेल.
– मागच्या सीटच्या मागे कंटेनर लावावा
– बाईक चालवण्याची परवानगी केवळ चालकालाच असेल.
