fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRA

कोरोना – आज ९ हजार ६१५ नवीन रुग्ण;२७८ मृत्यू

पुण्यात दिवसभरात १४७९ पॉझिटिव्ह, २९ मृत्यू

मुंबई, दि.२४: राज्यात आज ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख  ९९ हजार ९६७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४३  हजार ७१४  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ८७  हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७  हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६८ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  २७८  मृत्यू हे मुंबई मनपा-५४, ठाणे-४, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-१०,कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-१६, वसई-विरार मनपा-४, पालघर-२,रायगड-१०, पनवेल मनपा-४, नाशिक-१, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे- १, जळगाव-९, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-८, पुणे मनपा-४९, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर-५, सोलापूर मनपा-४, सातारा-३, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, हिंगोली-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-३, बीड-२, नांदेड-३, नांदेड मनपा-१, यवतमाळ-१,नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

*पुणे शहर ..!
………

  • दिवसभरात 1479 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 817 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 29 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 45544

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 17686

  • एकूण मृत्यू – 1133
  • एकूण डिस्चार्ज- 26725

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading