Sunday, June 21, 2026
PUNE

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कारासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा; आमदार टिंगरे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

पुणे ; दि. 24 – साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आमदार टिंगरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यात महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊ साठे यांचे नाव आग्रगण्य आहे. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारण्याचे मोठे काम केले आहे. सण 2020 हे अण्णाभाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील नाव व केलेले कार्य पाहता महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस होणे आवश्यक आहे. त्यासाठी विधानसभा व विधान परिषदेत ठराव होणे आवश्यक आहे. मात्र, कोरोना साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती हे तात्काळ शक्य नाही. त्यामुळे शासनाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे, अशी महाराष्ट्रातील तमाम बांधवांची मागणी व ईच्छा आहे. तरी

राज्य शासनाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून तो तातडीने केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा अशी मागणी आमदार टिंगरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंबंधीच्या मागणीचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading