Sunday, June 21, 2026
PUNE

रुग्णालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये विषाणूनाशक यंत्रणा लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन – उद्योग मंत्री

पुणे, दि. 22 – आयनायझेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोना सारख्या विषाणू चा नाश करणाऱ्या ‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे संशोधन सद्यस्थितीत महत्वाचे असून रुग्णालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये विषाणूनाशक यंत्रणा लावण्याचा प्रस्तावावर आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत ‘,असे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी सांगितले.

पुण्यातील अभियंता आणि इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा .लि .चे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांना या अभिनव संशोधनाची माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखवले . आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी ‘कोरोना किलर ‘ विषाणू नाशक इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली कार्यक्षमता प्रमाणपत्र यावेळी उद्योग मंत्र्यांना देण्यात आली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले ,’हे इलेक्ट्रॉनिक उपकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काळाची गरज ओळखून तयार केलेले आहे. आवश्यक परीक्षण संस्थांची प्रमाणपत्रे असल्याने हे उपकरण सगळीकडे लावणे शक्य आहे . ज्या हॉस्पिटलमध्ये कोविड -१९ चे रुग्ण आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ,सेंटरमध्ये डिसन्फेक्ट करण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासंदर्भात आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलू . त्या प्रकारचा प्रस्ताव सादर करावा , औद्योगिक आस्थापनांमध्ये हे मशीन लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
यावेळी ‘ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल ‘ या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading