Monday, August 31, 2026
PUNE

भाजप महायुतीच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध आंदोलन

पुणे, दि. 20 – कोरोनाच्या काळात दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांच्या न्याय मागण्या राज्य शासनाने मान्य कराव्यात यासाठी भाजप, आरपीआय (ए), राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील निवेदन आणि दुधाच्या पिशव्या भेट देण्यात आल्या. आणि मागण्या पूर्ण न झाल्यास 1 ऑगस्ट रोजी पूर्ण राज्यभर भाजप महायुतीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

भामा आसखेड प्रकल्पाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट,जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे अध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे शहर अध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर,परशुराम वाडेकर,राजेश येणपुरे, दिपक नागपुरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading