पुण्यात लॉकडाउन वाढणार नाही, पण…

पुणे, दि. 20 – शहरात 13 जुलै पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला असून 23 जुलै पर्यंत हा लॉकडाऊन कायम असणार आहे. लॉकडाऊनची घोषणा करताच पुण्यातील काही व्यापारी संघांनी याचा विरोध दर्शविला होता परंतु नंतर त्यांनी देखील लॉकडाऊनला समर्थन दिले लॉकडाऊन मध्ये पहिले पाच दिवस हे कडक निर्बंध लावण्यात आले होते ज्या मध्ये फक्त मेडिकल सेवा व दुध सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. रविवारी किराणा, भाजीपाला, अंडी, चिकन, मटणची दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली तर सोमवार पासून जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत खुली करता येणार आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडून पत्रकार परिषद घेण्यात आली ज्या मध्ये लॉकडाऊन मध्ये शहरात चाचणी करण्यासाठी मदत झाली असल्याचे तसेच हॉस्पिटल मधील बेड ची सुविधा वाढवण्याकरीत मदत झाल्याचे राम यांनी सांगितले.तर राम यांनी 23 जुलै ला लॉकडाऊन काढण्यात येणार आहे व त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नसल्याचे सांगितले आहे परंतु लॉकडाउन जरी काढले तरी काही निर्बंध लागू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात बाजारपेठांत तसेच लग्न समारंभात
होत असलेल्या गर्दीला आळा घालण्यासाठी काही निर्बंध लावण्यात येण्यावर विचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले आहे लॉकडाऊन 23 जुलै रोजी संपत असून त्या नंतर काय निर्बंध लावणार आहे या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे परंतु लॉकडाऊन नंतर पुन्हा लॉकडाऊन नसणार हे मात्र नागरिकांसाठी चांगली बातमी असली तरी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना कडक कारवाईसाठी काही निर्णय घेणार असल्याचे संकेत मात्र या वेळी देण्यात आले.
