सुर्यदत्ता पब्लिक स्कुलचा निकाल 100 टक्के
पुणे, दि. 18 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सुर्यदत्ता पब्लिक स्कुलने घवघवीत यश संपादन केले. यंदा ‘एसपीएस’चा निकाल 100 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 98 टक्के, कला व वाणिज्य शाखेचा निकाल 93 टक्के लागला आहे, असे प्राचार्या किरण राव यांनी सांगितले. विज्ञान शाखेत साकेत तुंगारे (93.8 टक्के) प्रथम, कस्तुरी सुमिरण (93.2 टक्के) द्वितीय, तर अवनी मालवीय व रिया पेंडसे (93.1 टक्के) तृतीय आले. वाणिज्य शाखेत प्रचिती खांडेकर (87.7 टक्के) प्रथम, वेद लाड (87 टक्के) द्वितीय, तर सार्थक अंभोरकर (86.15 टक्के) तृतीय आले. कला शाखेतुन भावना झा (89 टक्के) प्रथम, वृंदा पसरीजा (88.5 टक्के) द्वितीय, तर भार्गवी हुंबरे (88.3 टक्के) तृतीय आले.
सुर्यदत्ता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सर्वांचे अभिनंदन केले. डॉ. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाचा फायदा झाला. विविध संसथांबरोबर सामंजस्य करार, डिजिटल लर्निंग, लाईव्ह सेमीनार्स आणि इतर उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, सल्ला व समुपदेशन केल्याचा हा परिपाक आहे.”