Sunday, June 21, 2026
MAHARASHTRAPUNE

लोणावळा आणि खंडाळा रेल्वे स्टेशन चालणार सौरऊर्जेवर

पुणे, दि. 17 – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा आणि खंडाळा रेल्वे स्थानका दरम्यान सौरऊर्जा निर्मि केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात ही दोन्ही रेल्वे स्थानके सौरऊर्जेवर चालणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 2030 सालापर्यंत भारतीय रेल्वे कार्बनमुक्त करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आघाडी घेतली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हरित ऊर्जेच्या वापरासह अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सौरऊर्जा हा या उपक्रमाचा एक भाग आहे. खंडाळा रेल्वे स्थानक आणि तेथील रेल्वे परिसर स्वच्छ आणि हरित ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लोणावळा रेल्वे स्थानकाचा समावेशही लवकरच सौरऊर्जेचा वापर करणार्‍या रेल्वे स्थानकाच्या यादीत होणार आहे. फलाटावरील छतावर 76 किलोवॉट ऊर्जा निर्मितीसाठीही सौर पॅनेल्स बसविली आहेत. त्यातून 68 हजार 400 किलोवॉट क्षमतेची ऊर्जा निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading