fbpx
Thursday, April 25, 2024
Sports

राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त नारायणराव पवार यांचे निधन

पुणे, दि. १७ – भारतीय वारकरी मंडळाचे मा. अध्यक्ष, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त, वस्ताद नारायणराव पवार (वय ९० वर्षे) यांचे दि. १६ जुलै २०२० रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंगराव पवार, तीन विवाहित कन्या, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

कै. नारायणराव पवार यांना कोकणस्थ परिवार यांच्या वतीने ‘स्व. भाई नेवरेकर क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या आरतीची परंपरा सुरु केली. कै. पवार हे विविध संस्थामध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. पुणे शहरात वारकरी मंडळ व राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त म्हणून सांप्रदायिक व क्रीडा क्षेत्रात बहुमोल योगदान दिले.

राष्ट्रीय तालीम संघ, कोकणस्थ परिवार तथा क्रीडा, सांस्कृतिक-सांप्रदायिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading