युनिक ज्यु. कॉलेजचा इयत्ता बारावीचा सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकाल

पुणे, दि. १६ – ईगल एज्युकेशन सोसायटी संचलित कात्रज कोंढवा रोड, गोकुळ नगर येथिल युनिक इंग्लिश मिडिअम स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेमध्ये ऋषिकेश कामठे याने ८२.१५ % गुण मिळवून प्रथम क्रमांक तर सिद्धार्थ शर्मा याने ८०.४६ % गुणांसह दुसरा क्रमांक पटकविला. तसेच वाणिज्य शाखेमध्ये पूजा आगे हिने ८३.५३ % गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर पायल मोरे हिने ८०.७७ % गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. त्याचबरोबर परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतील ७९% तर वाणिज्य शाखेतील ५८ % विद्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन पास झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी व प्राचार्या सौ. जयश्री जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
