Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

कोरोना चिंता कायम, राज्यात आज ८ हजार ६४१ नवीन रुग्ण तर तब्बल २६६ मृत्यू

मुंबई, दि.१६: राज्यात आज ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २६६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २६६ मृत्यू हे मुंबई मनपा-५६, ठाणे-११, ठाणे मनपा-१७, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-१८,भिवंडी-निजामपूर मनपा-१३, मीरा-भाईंदर मनपा- २२, पालघर-२, वसई-विरार मनपा-४, रायगड-२५, पनवेल मनपा-५, नाशिक-२, नाशिक मनपा-७, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, जळगाव-२, नंदूरबार-५, पुणे-२, पुणे मनपा-१९, पिंपरी-चिंचवड मनपा-१६,सोलापूर मनपा-१, कोल्हापूर मनपा-२, रत्नागिरी-१,औरंगाबाद मनपा-५, लातूर-१, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-४, बीड-२, अकोला-१,अमरावती-२, अमरावती मनपा-१, यवतमाळ-२, बुलढाणा-३ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading