कोरोना – आज ७ हजार ९७५ नवीन रुग्ण; २३३ मृत्यू
मुंबई, दि.१५ : राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ११ हजार ८०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २३३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९६ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २३३ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-५, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-१५, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी-निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१,वसई-विरार मनपा-५, रायगड-४, पनवेल मनपा-१, नाशिक-४, नाशिक मनपा-९, धुळे-१, धुळे मनपा-२, जळगाव-५, जळगाव मनपा-९, पुणे-६, पुणे मनपा-३१, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-१, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-४, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
