Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मध्‍ये मल्लिका अलाद्दिनच्‍या अम्‍मीला जिनमध्‍ये बदलणार

सोनी सबवरील मालिका अलाद्दिन: नाम तो सुना होगाने प्रेक्षकांसाठी रोमांचचा स्‍तर उंचावत ठेवला आहे. आगामी नवीन एपिसोड्समध्‍ये दुष्‍ट शक्‍ती व जिनची निर्माती मल्लिकाचा कपटी प्रवेश, तसेच अखेर विवाह बंधनात अडकणारे प्रेमीयुगुल अलाद्दिन व यास्‍मीनच्‍या बहुप्रतिक्षित विवाहासह रोमांचचा स्‍तर वाढणार आहे.

जफरचा मृत्‍यू आणि साम्राज्‍यामधून सर्व दुष्‍ट शक्‍तींचा नायनाट केल्‍यानंतर संपूर्ण कुटुंब भव्‍य विवाह सोहळ्याच्‍या तयारीला लागले आहे. पण अलाद्दिनला माहित नाही की, त्‍याचा हा आनंद काही काळापुरताच आहे. दुष्‍ट शक्‍तीची निर्माती मल्लिकाने बगदादमध्‍ये प्रवेश केला आहे. सर्वजण विवाहाच्‍या तयारीमध्‍ये असताना जोडप्‍यांना आशिर्वाद देण्‍यासाठी ओळखली जाणारी मरियम खतून या जोडप्‍याला आशिर्वाद देण्‍यासाठी राजवाड्याकडे येत असते, पण वाटेत तिचा सामना मल्लिकासोबत होतो. मल्लिका मरियम खतूनला राखेमध्‍ये बदलून टाकते आणि राजवाड्यामध्‍ये प्रवेश मिळवण्‍यासाठी तिचे रूप घेते.

मरियम खतूनच्‍या वेषात आलेली मल्लिका जोडप्‍याला आशिर्वाद देण्‍यापूर्वी अलाद्दिनला तिला पाहिजे असलेली गोष्‍ट देण्‍यासाठी त्‍याच्‍या अम्‍मीची शपथ घेण्‍यास सांगते. अलाद्दिन त्‍याच्‍या अम्‍मीची शपथ घेणारच असतो की, त्‍याला मल्लिकाच्‍या पाठीवर टॅट्टू दिसतो. त्‍याला जिनूने एकदा सांगितलेली गोष्‍ट आठवते की, मल्लिकाला तिच्‍या असामान्‍य टॅट्टूमधूनच ओळखता येऊ शकते. अलाद्दिनला धक्‍का बसतो आणि मल्लिका तिला पाहिजे असलेली गोष्‍ट देण्‍यासाठी त्‍याला घाबरवते आणि तसे केले नाही तर त्‍याचे संपूर्ण कुटुंब संकटात सापडेल. आपली इच्‍छा पूर्ण करून घेण्‍यासाठी मल्लिका शेवटच्‍या जिन टॉनिकसह अम्‍मीला जिनमध्‍ये बदलते.

अम्‍मी जिनमध्‍ये रूपांतरित झाल्‍यानंतर अलाद्दिनची प्रतिक्रिया काय असेल? तो मल्लिकाच्‍या नियंत्रणामधून त्‍याच्‍या आईची सुटका करू शकेल का?

अलाद्दिनची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्‍हणाला,”जफरचा पराभव केल्‍यानंतर अलाद्दिन त्‍याची प्रेमिका यास्‍मीनसोबत विवाह होणार असल्‍याने खूपच आनंदित आहे. पण साम्राज्‍यावर आता मोठे संकट येणार आहे आणि ते संकट म्‍हणजे जिनची शक्तिशाली निर्माती मल्लिका. अलाद्दिन मल्लिकाचे हेतू जाणून घेण्‍यासाठी नीडरपणे तिच्‍याशी सामना करतो. पण त्‍याला माहित नसते की, मल्लिका त्‍याच्‍या जीवनातील महत्त्वपूर्ण व्‍यक्‍ती म्‍हणजेच त्‍याच्‍या अम्‍मीला हिरावून घेणार आहे. मल्लिकाने अम्‍मीला जिनमध्‍ये बदलल्‍यामुळे अलाद्दिनसमोर त्‍याचे साम्राज्‍य आणि कुटुंबाचे संकटापासून संरक्षण करण्‍यासाठी भावनिक व अवघड आव्‍हान उभे राहणार आहे.

मल्लिकाची भूमिका साकारणारी देबिना बॅनर्जी म्‍हणाली,”मल्लिका एका गुप्‍त मिशनवर आहे आणि तिची अलाद्दिनच्‍या माध्‍यमातून तिचे ध्‍येय संपादित करण्‍याची इच्‍छा आहे. मल्लिका ही घातक व शक्तिशाली आहे, जी नेहमी तिचा मार्ग शोधून काढते. आगामी एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना धक्‍कादायक ट्विस्‍ट पाहायला मिळणार आहेत. ती तिच्‍या शेवटच्‍या जिन टॉनिकसह अलाद्दिनच्‍या आईला जिनमध्‍ये बदलते. तिचे काही रहस्‍यमय हेतू आहेत,ज्‍यांचा उलगडा आगामी एपिसोड्समध्‍ये पाहायला मिळेल. तर मग मालिका पाहत राहा, मल्लिकाने तिचे मिशन नुकतेच सुरू केले आहे आणि अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading