fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

‘भाखरवडी’ मालिकेने घेतली ७ वर्षांची झेप

काळ पुढे सरकतो आणि त्‍याप्रमाणे जीवन देखील पुढे सरकते. सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’ लवकरच ७ वर्षांची झेप घेणार आहे. होय, या ७ वर्षांमध्‍ये भरपूर बदल होणार आहेत. सोनी सब ‘भाखरवडी’सह इतर मालिकांचे नवीन एपिसोड्स प्रसारित करत प्रेक्षकांना पूर्णत: नवीन ‘खुशियोंवाला झोन’मध्‍ये घेऊन जाणार आहे. होय, सर्वांचे लाडके गोखले व ठक्‍कर कुटुंब आणि त्‍यामधील लोकप्रिय नवीन कौटुंबिक सदस्‍य रोमांचक पटकथेसह परतणार आहेत.

‘भाखरवडी’ या हलक्‍या-फुलक्‍या कौटुंबिक मनोरंजपूर्ण मालिकेतील कुटुंबामध्‍ये नवीन सदस्‍य येणार आहे. ७ वर्षांची झेप अभिषेक व गायत्रीचा मुलगा कृष्‍णाला सादर करेल. हरमिंदर सिंगने ही भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांनी आतापर्यंत अभिषेक व गायत्रीच्‍या सुंदर प्रेमकथेचा आनंद घेतला आहे. मालिकेच्‍या काळझेपनंतर या जोडप्‍यामधील नाते बदलताना पाहायला मिळणार आहे.

फासे बदलले आहेत, अभिषेक आता प्रेमळ जावयाप्रमाणे ठक्‍कर कुटुंबामध्‍ये राहत आहे, तर गायत्रीला गोखले कुटुंबामध्‍ये राहणे पसंत आहे. दोन्‍ही कुटुंबांमधील नाते तणावपूर्ण असले तरी कृष्‍णाच्‍या भल्‍यासाठी ते त्‍यांच्‍यामध्‍ये आनंदमय संबंध असल्‍याचे नाटक करतात आणि मुलाचे प्रेम व काळजीसह संगोपन करतात.

या वर्षांमध्‍ये अभिषेक व गायत्रीच्‍या वैवाहिक जीवनासोबत मोठ्यांच्‍या जीवनात देखील अनेक आव्‍हाने आली आहेत. अण्‍णांना आता ऐकायला कमी येते आणि ते ऐकण्‍यासाठी कानाला मशिन लावतात. महेंद्र काळासह विसरभोळा बनला आहे. दुसरीकडे देवांषी सोमय्या साकारणारी भूमिका उज्‍ज्‍वला ही मोठी होऊन आत्‍मविश्‍वासू तरूण महिला बनली आहे, तर नितीन भाटिया साकारणारी भूमिका मंदार एक देखणा व प्रेमळ नातू म्‍हणून मोठा झाला आहे.

काही नवीन चेहरे व नवीन पटकथेसह सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’ची खट्टी-मिठी कहानी तोच जोश व उत्‍साहासह परतणार आहे.

अण्‍णाची भूमिका साकारणारा देवेन भोजानी म्‍हणाला,”कथेमधील ७ वर्षांची झेप सुरेखरित्‍या रचण्‍यात आली आहे. आमचे प्रेक्षक पात्रांमधील बदललेले नाते आणि गोखले व ठक्‍कर कुटुंबांमधील हलक्‍या-फुलक्‍या विनोदी गमतीजमतींचा आनंद घेतील. माझी भूमिका अण्‍णाला वाढत्‍या वयामुळे आता ऐकायला कमी येत आहे. माझ्या भूमिकेमध्‍ये या नवीन घटकाची भर करणे अत्‍यंत रोमांचक आहे. मी लॉकडाऊननंतर आमच्‍या प्रेक्षकांसाठी ‘भाखरवडी’ मालिका पुन्‍हा सादर करण्‍याकरिता उत्‍सुक आहे. तर मग #SwitchOnSABआणि १३ जुलैपासून ‘भाखरवडी’चे नवीन एपिसोड्स पाहण्‍याचा आनंद घ्‍या.”

गायत्रीची भूमिका साकारणारी अक्षिता मुदगल म्‍हणाली,”ही काळझेप माझ्या पात्रामध्‍ये नवीन भूमिकेची भर करते. मी यापूर्वी ‘भाखरवडी’मध्‍ये आईची भूमिका साकारली आहे. ७ वर्षांची झेप गायत्रीच्‍या मुलाला सादर करते. सेटवर लहान मुल असल्‍यास खूप धमाल येते. मी गायत्रीच्‍या जीवनातील या नवीन भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.”

अभिषेकची भूमिका साकारणारा अक्षय केळकर म्‍हणाला,”माझी भूमिका अभिषेक आता वडिल बनला आहे आणि ही भूमिका माझ्यासाठी नवीन आहे. मी वडिलांचे बारकावे योग्‍य करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. पटकथा नवीन आहे, सोबतच ‘भाखरवडी’चा अस्‍सल सार कायम ठेवण्‍यात आला आहे. दीर्घकाळानंतर सर्व कलाकरांना भेटल्‍याचा आनंद झाला आहे. मी आमच्‍या प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. तर मग #SwitchOnSABआणि ‘भाखरवडी’ची खट्टी-मिठी कथा पाहण्‍याचा आनंद घ्‍या.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading