Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

कोरोना – राज्यात आज ६ हजार ७४१ नवीन रुग्ण; २१३ मृत्यू

पुणे – दिवसभरा ७५० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

मुंबई, दि.१४: राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

१४ जुलै पुण्यातील करोना रुग्ण स्थिती
पुण्यात रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले

  • दिवसभरा ७५० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ७२८
  • बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
    एकूण रुग्ण – १८८२४
  • आज दिवसभरातील एकूण मृत्यू – २५ ( ८ मृत्यू पुण्याबाहेरील रुग्ण)
  • पुण्यातील एकूण मृत्यू – ८७४
  • शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ५१३
  • व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – १९८
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – २९१०७
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ९४०९
  • आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ३८२० + १९२९ रॅपिड टेस्ट

– आज पर्यंतच्या एकूण करोना चाचण्या -१७१७७२

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading