Wednesday, October 28, 2026
MAHARASHTRA

एमपीएसी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम

पुणे, दि. 14 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा’मधील लिपिक-टंकलेखन पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. या परीक्षेत सांगलीतील विजय लाड हे राज्यात व मागासवर्गीयातून प्रथम आले आहेत. महिलांमध्ये अमरावतीच्या प्राजक्ता चौधरी प्रथम आल्या आहेत. 179 जागांसाठी ही भारती प्रक्रिया राबविली होती.
राज्य सेवा परीक्षेनंतर आता लिपीक- टंकलेखन पदाचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीने 6 आणि 10 ऑक्टोबर 2019 रोजी लिपिक-टंकलेखन (मराठी व इंग्रजी) या संवर्गातील एकूण 179 पदांसाठी ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाने मंगळवारी जाहीर केला. संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेले दावे निकालासाठी विचारात घेऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे.

अपंगासाठी राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अधीन राहून त्यांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे. या परीक्षेच्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करावा, असे आयोगाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे

Leave a Reply