Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENT

कोरोना – दिग्दर्शिका झोया अख्तर चा बंगला सील

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. दोनच दिवसापूर्वी मुंबई महापालिकेने अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील केला होता. त्यानंतर आता रेखा यांच्या अगदी बाजूला असलेला बॉलिवूडच्या प्रसिद्ध लेखिका आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांचाही बंगला सील करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी पालिकेने झोया अख्तर यांचा बंगला सील केला. झोया आणि रेखा या दोघीही वांद्रे येथील बँडस्टँड येथील परिसरात राहतात. खबरदारीचा उपाय म्हणून झोया यांचा बंगला सील करण्यात आला आहे. तसेच बंगल्याबाहेर पालिकेने नोटीस देखील लावली आहे.

रेखा यांच्याप्रमाणेच अभिनेत्री सारा अली खान यांच्या वाहन चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याआधी आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांच्या घरातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच अनुपम खेर यांची आई, भाऊ आणि वहिनीला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर आतापर्यंत कनिका कपूर, किरण कुमार, झोया मोरानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि एश्वर्या राय बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading