Saturday, June 20, 2026
PUNE

पुणे, पिंपरी- चिंचवड पुन्हा लॉकडाउन जाणून घेण्यासाठी काय सुरू?काय बंद राहणार

पुणे – कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात मंगळवारी मध्यरात्री पासून पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले. यानुसार दि. 18 जुलैपर्यंत फक्त दूध विक्री, मेडिकल आणि रुग्णालये सुरू असतील. तर, दि.19 ते 23 जुलै या कालावधीत मर्यादित वेळेत अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या या दहा दिवसांमध्ये सर्व दिवस वृतपत्रांची छपाई तसेच त्यांचे वितरण सुरू राहणार असल्याचे आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तर, 65 वर्षांवरील व्यक्ती तसेच 10 वर्षांच्या आतील मुलांना फक्त वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडता येणार आहे.

तसेच सवलती असलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणालाही पायी अथवा वाहन घेऊन बाहेर पडता येणार नाही. अशा व्यक्तींची वाहने जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर, ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सुविधा आहे, तेथे बांधकाम सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर, मॉर्निंग वॉक, सायंकाळच्या फेरफटक्यास बंदी घालण्यात आली आहे.

शहरात या गोष्टी पूर्णपणे बंद राहणार

* सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यावसायिक दुकाने, सर्व उद्योग
* सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा
* उपहारगृह, लॉज, हॉटेल्स, डान्स बार, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट
* सर्व केश कर्तनालये, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर
मंडई, आडते मार्केट, फळ विक्री, आठवडे बाजार
* शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व शिकवणी वर्ग
*सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, दुचाकी, तीन चाकी व चार चाकी
सार्वजनिक व खाजगी बस सेवा संपूर्णतः बंद राहतील.
* ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टरसारखी मालवाहतूक वाहने दि. 18 जुलैपर्यंत बंद
* सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह
* सर्व मंगल कार्यालये, हॉल तसेच लग्न, स्वागत समारंभ
* सर्व प्रकारच्या खाजगी संस्थांची कार्यालये
* सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रम व सभा
धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे
फुड डिलिव्हरी, होम डिलिव्हरी सेवा 24 जुलैपर्यंत बंद
* ई- कॉमर्स सुविधा 19 जुलैपर्यंत बंद

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading