fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

रविवारी ७ हजार ८२७ नवीन कोरोनाबधित;

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर!

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, बीड-१, नांदेड-३, अकोला मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

पुणे १२ जुलै अपडेट

– दिवसभरात ६२१ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४८६ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात २४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– ४८६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात १७२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २७५२५
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-२६५२९ आणि ससून ९९६)
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९२०३.
– एकूण मृत्यू -८४०.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १७४८२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५५२ आणि ॲंटिजेन किटद्वारे ९६२.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading