Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENT

अभिषेक बच्चन सुद्धा करोना पॉझिटिव्ह

मुंबई – महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करुन सांगितलं. त्यापाठोपाठ आता अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.आज माझी आणि माझ्या वडिलांची म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्हा दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफला विनंती केली आहे की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांनीही करोना चाचणी करावी. सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहनही मी करतो आहे असंही अभिषेक बच्चन यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading