अग्रिमा जोशुआ ला अटक करा – संभाजी ब्रिगेड ची मागणी
पुणे, दि. 11 – च्या नादात आपण कोणत्या राष्ट्रपुरूषाची बदनामी करतो याचं भान सर्वांनी राखलं पाहिजे. दिड दमडीची अग्रिमा जोशुआ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विनोदातून टिंगल करून जर बदनामी करत असेल तर राज्य सरकारने तिला अटक करावी… अशा दीड दमडीच्या कलाकारांना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महापुरुषांबद्दल चुकीचं बोलतो, हे तिचे संस्कार आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर केला होता… ही शिकवण महाराष्ट्राची आहे. म्हणून राज्य सरकार व गृहमंत्री यांनीअग्रिमा जोशुआ तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाहीत. छत्रपती सर्वोच्च राजे असून, जगभर त्यांच्या विचारांचा, कर्तुत्वाचा जागर होतो. मात्र काही तथाकथित मनुवादी मंडळी नेहमी कथा-कादंबऱ्या व विनोदी कार्यक्रमातून आजपर्यंत बदनामी करत आलेले आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे वेळोवेळी त्यांची बदनामी अशा विकृत मंडळी करत असतात. यांना वेळीच लगाम लावला पाहिजे. जर ही महाराष्ट्रात फिरली तर महाराष्ट्रातील महिला अग्रिमा जोशुआ चे थोबाड फोडून काढतील… परंतु बदनामी सहन करणार नाहीत. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे ‘प्राण’ आहेत. असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.
