Saturday, June 20, 2026
PUNE

आयडीबीआय बँकेच्यावतीने ४० लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द

पुणे, दि. १०- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने ४० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्‍यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोनाविरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच इतर आवश्यक साहित्यही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.  यावेळी आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक संजय पणीकर तसेच विभागीय आयुक्त् ‍ डॉ. दीपक म्‍हैसेकर, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading