फेसबुक व पबजीसह ८९ अॅप्स डिलीट करण्याचे आदेश !
नवी दिल्ली, दि. ९ – भारत आणि चीनमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे.त्यामुळे आता फेसबुक,टिकटॉक व पबजी सारख्या ८९ अँड्रॉइड अॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे.हा आदेश जारी केला असून भारतीय लष्कराच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला.लष्करातील सैन्याच्या मोबाईलमधून कोणतीही माहिती लीक होऊन नये म्हणून भारतीय लष्कराने हा आदेश सैन्यासाठी काढला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या लष्करात झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते.यानंतर भारत सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी आणून चीनला दणका दिला होता.मात्र आता पुन्हा भारतीय सैन्याने ८९ अॅप्सवर बंदी आणून आपल्याकडील माहिती लीक होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये Facebook, Tik Tok च नाही तर Likee, युसीब्राऊझर आणि पबजी सारखे प्रसिद्ध अॅप्सचाही समावेश आहे.खास करून टिंडर सारख्या डेटिंग अॅप्सलाही डिलीट करण्यास सांगितलं आहे.त्यामुळे जवानांना आता हे सर्व अॅप्स मोबाइल मधून डिलीट करावे लागणार आहे.
