fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया- पुणे चॅप्टर तर्फे३ रा वस्तू व सेवा कर दिवस साजरा

पुणे, दि. ६ – एक राष्ट्र एक कर ह्या संकल्पनेतून भारत सरकारने दिनांक १ जुलै २०१७ रोजी लागू केलेल्या वस्तू व सेवा कर प्रणालीला ३ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया  दिनांक १ जुलै २०२० ते ७ जुलै २०२० हा वस्तू व सेवा कर सप्ताह साजरा करत आहे. त्या निमीत्त द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया- पुणे चॅप्टर तर्फे दिनांक ४जुलै २०२० रोजी वस्तू व सेवा कर दिवस साजरा करण्यात आला. ह्या समारंभाला अध्यक्ष म्हंणून आय सी ए आय च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष व केंद्रीय समितीचे पुणे येथील प्रतिनिधी सी एम ए नीरज जोशी होते,त्यांनी वस्तू व सेवा कर प्रणालीला ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या यशापयशाबद्दल सांगितले तसेच हा दिवस साजरा केल्या बद्दल पुणे चॅप्टर च्या अध्यक्षा सी एम ए सुजाता बुधकर व सर्व समिती सदस्यांचे अभिनंदन केले.विशेष अतिथी म्हणून द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष सी एम ए अमित आपटे उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री राजीव कपूर(कमिशनर,सेंट्रल टॅक्स पुणे-2) लाभले होते त्यांनी आपल्या भाषणात भारत सरकारला वस्तू व सेवा कर लागू करतांना आलेल्या अडचणी आणि तीन वर्षानंतर त्यातून मिळणारे फायदे ह्या बद्दल मुद्देसूद विवेचन केले.

ह्या कार्यक्रमासाठी औदयोगिक क्षेत्रातील उच्चपदस्थ कॉस्ट अकौंटंट व प्रतिथयश प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकौंटंट वक्ते होते.त्यात सी एम ए व्ही एस दाते,सी एम ए डॉ.संजय भार्गवे, सी एम ए डॉ.वामन पारखी व सी एम ए राजेश शुक्ला होते सर्व वक्त्यांनी वस्तू व सेवा कर प्रणाली बद्दल अत्त्यंत माहिती पूर्ण विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन पुणे चॅप्टर समिती सदस्य सी एम ए निलेश केकाण ह्यांनी केले. सर्व मान्यवरांचे ,उपस्थित सदस्यांचे व विद्यार्थ्यांचे  स्वागत संस्थेच्या अध्यक्षा सी एम ए सुजाता बुधकर ह्यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सी एम ए राहुल चिंचोळकर ह्यांनी केला.अध्यक्ष,विशेष अतिथी व वक्तयांचा परिचय सी एम ए नागेश भागणे  व सी एम ए श्रीकांत इप्पलपल्ली ह्यांनी केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुणे चॅप्टर चे सर्व कार्यकारिणी सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

 कार्यक्रमाला  पुणे परिसरातील बहुसंख्य कॉस्ट अकौंटंट व विद्यार्थ्यांनी गूगल मीट अँप वरून उपस्थिती  लावली.

आभार प्रदर्शन  सी एम ए राहुल चिंचोळकर ह्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading