fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

कोरोना – आज 5 हजार 368 नवीन रुग्ण तर २०४ बळी

सोमवारी पुण्यात 861 तर पिपरी चिंचवड मध्ये 573 कोरोनाबधित

गेल्या चार दिवसात 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात 87 हजार 681 रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री

मुंबई, दि. ६ : राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १५ हजार २६५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ३५५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २०४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच एकावेळी तब्बल 573 रुग्णांना कोरोनाची लागण झालीये. शहरातील आकडा 5000 जवळ पोहचलाय. तर आत्तापर्यंत 2906 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.आज एकाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात नोंद झालेले २०४ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-६, ठाणे मनपा-१०, नवी मुंबई मनपा-२८, कल्याण-डोंबिवली मनपा-२, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-५, वसई-विरार मनपा-१३, पालघर-१, रायगड-१, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-१३, अहमदनगर-१, धुळे-३, धुळे मनपा-२, जळगाव-१२, जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-१३, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-५, सातारा-४, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-७, जालना-५, लातूर-१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड-१, अकोला-१, अकोला मनपा-२, अमरावती मनपा- १, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

६ जुलै पुण्यातील करोना रुग्ण स्थिती

  • दिवसभरात ८६१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ६३०
  • बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
    एकूण रुग्ण – १७३९
  • आज दिवसभरातील एकूण मृत्यू – १५
  • पुण्यातील एकूण मृत्यू – ७३०
  • शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ३६८
  • व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ६४
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – २२३८१
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ७९१२
  • आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ४२८४ + २६४ रॅपिड टेस्ट
  • आज पर्यंतच्या एकूण करोना चाचण्या १३७३६४

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading