fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

गुरुपौर्णिमा – दत्त मंदिर बंद राहणार

पुणे, दि. 4 – बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरावर साधेपणाने विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच सर्व क्षेत्रात काम करणा-या गुरुरुपी जीवरक्षकांना मंदिरावर लावलेल्या २० बाय १५ च्या फलकाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading