Saturday, April 4, 2026
MAHARASHTRA

कोरोना – सलग दुसऱ्या दिवशी ६ हजारपेक्षा जास्त रुग्ण, १९८ मृत्यू

पुण्यात ८०७ पॉझिटिव्ह तर ६१९ कोरोनामुक्त

मुंबई, दि. ३ : राज्यात आज कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख  ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी  १ लाख ९२ हजार ९९० नमुने पॉझिटिव्ह (१८.३९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार  ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी  १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३४ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १५० मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-२, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-५, मालेगाव मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-३, जळगाव मनपा-२, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१६,सोलापूर मनपा-५, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-४, जालना-५, लातूर-१, अकोला-२, अकोला मनपा-१, अणरावती-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

३ जुलै पुणे अपडेट्स

  • दिवसभरात ८०७ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ६१९ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात नऊ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • ३८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १९८४९.
    (डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-१८९६८ आणि ससून ८८१)
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६८७४.
  • एकूण मृत्यू -६८५.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १२२९०.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४२५०.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading