रविंद्र गोलर यांची लायन्स क्लबच्या रिजन चेअरपर्सनपदी निवड
पुणे, दि. १ – रविंद्र गोलर यांची लायन्स क्लबच्या रिजन चेअरपर्सनपदी निवड झाली आहे. डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय शास्त्री यांनी त्यांची नेमणूक केली. सन २०२०-२१ साठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच काशिनाथ येनपुरे, ज्ञानेश्वर थोरवे, आशिष मुजूमदार, राजेश बन्सल झोन चेअरपर्सन म्हणून काम पाहणार आहेत.
रविंद्र गोलर हे मागील १२ वर्षापासून लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सन २०१२- १३ साली त्यांना सर्वोत्कृष्ट झोन चेअरमन म्हणून गौरविण्यात आले आहे. सन २०१८-१९ मध्ये त्यांंनी आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
रविंद्र गोलर म्हणाले, लायन्स कल्ब इंटरनॅशनल ही १५ लाख सदस्यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणारी जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, मधुमेह, जयपूर फूट, आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज आणि नैसर्गिक आपत्ती मध्ये लायन्स काम करीत आहे. रिजन चेअरपर्सनपदी निवड झाल्याने अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली आहे. यामाध्यमातून अधिकाधिक गरजू लोकांपर्यत मदत पोहोचविता येईल.