fbpx

ख्यातनाम गायक पं. शरद जांभेकर यांचे निधन

मुंबई, दि. २५ – संगीताचार्य द वि काणेबुवांचे ज्येष्ठ शिष्य पं. शरद जांभेकर यांचे मुंबईत कोरोनामुळे लीलावती रूग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते.

सोमवारीच दुपारी एक तासाची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता केंद्रावरून प्रसारित झाली होती. सरळमार्गी गायक.. सात्त्विक स्वराचा गायक म्हणून त्यांची ओळख होती..
सुप्रसिद्ध गायक कै पं काणे बुवांच्या कडून तालीम मिळाली. आकाशवाणी सांगली व मुंबई येथे नोकरी करून निवृत्त झाले होते.
शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास. राधाधर मधुमिलींद जयजय, साध्यनसे मुनी कन्या, चंदनासी परीमल, इत्यादी गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध.
खडा आवाजाची देणगी असल्याने हिंदी व मराठी संगीतकारांबरोबर काम केले होते. संगीताचार्य पं. द वि काणेबुवांचे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यांची सुरुवात २१ फेब्रुवारी २०२०ला पं. शरद जांभेकर यांच्या गायनाने झाली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: