fbpx

लॉकडाऊन काळात विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ६४ लाखांचा दंड वसूल

कोविडसंदर्भात राज्यात ६ लाख २८ हजार व्यक्ती क्वारंटाईन

मुंबई दि.२० : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ६४ लाख १९ हजार ८७८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख २८ हजार व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ०४ हजार ३१पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९ जून या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २७९ (८५८ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ३५१

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २८ हजार ९२.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८४ हजार १६१

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४८

(मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १)

कोरोना बाधित पोलीस – ११८ पोलीस अधिकारी व ९८२ पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप – ९८ (सुमारे ३ हजार २३५ लोकांची व्यवस्था)

Leave a Reply

%d bloggers like this: