fbpx

‘अच्छे दिन’ संपले; राणू मंडल पुन्हा पहिल्या ट्रॅक वर

रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या राणू मंडल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्या आयुष्यात नवी पहाट आली. देशभर त्यांचं कौतुक केलं जाऊ लागलं. सिनेमासह अनेक टीव्ही चॅनल्सवर गाण्याच्या माध्यमातून राणू मंडल यांचा आवाज सगळीकडे पोहोचला. सोशल मीडियाच्या तर त्या नायिका झाल्या. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं सुप्रसिद्ध गाणं ‘प्यार का नगमा’ हे गाणं राणू मंडल यांनी गायलेल्या गाण्याने तर लोक स्तिमित झाले. मात्र ही लोकप्रियता आणि यश हे राणू यांच्यासाठी क्षणिकच ठरलं.

लॉकडाऊनच्या काळात दोन वेळेचं जेवण मिळणंही राणू मंडल यांच्यासाठी कठीण झालं आहे. त्यांना कधी एक वेळचं जेवण, त्यातही फक्त भात मिळत असल्याचं समोर आलं आहे. आसपासच्या लोकांनी काही दिलं तरच त्यांना अन्न मिळत आहे. अन्यथा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या राणू यांच्या एका व्हिडिओमुळे आयुष्य़ बदललं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याच राणू मंडल यांच्यावर ही वेळ ओढावल्याच्या आताची स्थिती आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये राणू मंडल यांना संधी दिली आणि राणू मंडल यांनी गायलेली इतर गाणीही लोकप्रिय झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: