fbpx
Friday, December 8, 2023
PUNE

येरवडा कारागृहातून दोन कैदी फरार

पुणे, दि. १३ – येरवडा परिसरात फिजिकल डिस्टंन्सिग राखण्याच्या दृष्टीने एका संस्थेच्या इमारतीमध्ये तात्पुरते कैद्यांसाठी कारागृह तयार करण्यात आले आहे. आज शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास येथून दोन कैदी बाथरूमच्या खिडकीतून बाहेर उडी टाकत फरार झाले आहेत.

हे दोन्ही आरोपी पिंपरी चिंचवड शहरातील आहेत. हर्षद सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) आणि आकाश बाबुराव पवार (वय २६, रा. काळेवाडी) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.

आकाश पवार याने मागेही कोरोना तपासणीच्या वेळेस रुग्णालयात गोंधळ घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यात तो यशस्वी झालेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Leave a Reply

%d