fbpx
Monday, October 2, 2023
MAHARASHTRA

ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचं निधन

मुंबई, दि. १३ – ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी आज पहाटे ४ च्या दरम्यान वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, पुत्र, नात असा परिवार आहे.
मुळचे कोल्हापूरचे असलेल्या मिराशी यांनी अनेक ख्यातनाम संस्थांच्या अनेक चित्रपट, मालिका आणि मुख्यत: नाटकांतून विविध प्रकारच्या अनेक भूमिका साकारल्या. आय एन टी, दुर्वांची जुडी, रंगमंच, मुंबई, नाट्यसंपदा, रंजन कला मंदिर या नाट्यसंस्थांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या.
रंगमंच, मुंबई या संस्थेच्या नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, असं झालंच कसं?, मी तर बुवा अर्धाच शहाणा या नाटकांत त्यांच्या भूमिका होत्या. तसेच दुर्वांची जुडीमधील त्यांच्या ‘बाळू आपटे’ला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: