fbpx

कोरोना – पाकच्या ‘या’ क्रिकेटपटू ने केले ट्विट ‘दुआओं की जरूरत है’

इस्लामाबाद, दि. 13 – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यानं लिहलं आहे की, गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली होती. माझे शरीर प्रचंड दुखत होते. त्यानंतर मी वैद्यकिय चाचणी केली आणि त्यात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.

कोरोनामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आफ्रिदी अनेक गरजूंना सातत्यानं मदत करत आहे. त्यानं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानमधील अनेक भागांमध्ये गरजूना अन्नधान्य वाटप केले. या कालावधीत तो अनेक लोकांना भेटला आणि त्यामुळेच त्याला कोरोना झाल्याची चर्चा सुरु आहे.

आफ्रिदीनं बागलादेशचा खेळाडू मुश्फिकर रहीम यालाही मदत केली. रहीमनं बांगलादेश मधील लोकांच्या मदतीसाठी त्याची द्विशतकाची बॅट लिलावासाठी ठेवली होती आणि आफ्रिदीनं ती खरेदी केली. यापूर्वी, पाकिस्तानचा माजी सलामीवर तौफीक उमर यालाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानं कोरोनावर मात केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: