fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

नवीन नियमावली मान्य झाल्यास प्रकल्प वेगाने मार्गी लागतील – राजेंद्र निंबाळकर

पुणे, दि. ९ – एस आर ए चे रखडलेले प्रकल्प व इतर प्रश्नांबाबत एस आर ए चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन दिल्यावर त्यांनी लगेचच चर्चेसाठी बोलाविले व प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व स्लम फ्री स्मार्ट सिटी बाबतच्या आशा पल्लवित केल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.श्री.राजेंद्र निंबाळकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले.

यावेळी माहिती देताना श्री.निंबाळकर म्हणाले की जे प्रकल्प रखडले आहेत अश्यांचा गेले २/३ दिवस आढावा घेतला जात असून प्रकल्प कोणत्या कारणाने रखडले व त्यातील अडचणी काय आहेत याबाबत संबंधित विकसकाशी चर्चा करत आहोत.एस आर ए ची स्थापना झाल्यापासून १५ वर्षात एकूण २८४ प्रस्ताव दाखल झाले व यातील झोपडीधारकांची संख्या ९३००० आहे,यातील २१९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले व त्याद्वारे तब्बल ७०००० झोपडीधारकांचे पुनर्वसन शक्य होऊ शकेल. मात्र विविध कारणाने ४५ योजनांची छाननी सुरु असून हे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत* असेही त्यांनी सांगितले. ( सोबत विस्तृत गोषवारा जोडला आहे )
पुणे महापालिकेच्या मालकीच्या जागेवर २३ झोपडपट्टी असून सुमारे ५० एकर क्षेत्रात त्या वसलेल्या आहेत व यात सुमारे ५०००० नागरिक वास्तव्य करतात ,पुणे मनपा ने यांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव दाखल केल्यास किमान ७०% झोपडीधारकांची पुनर्वसन प्रकल्पास संमती असावी अशी अट शिथिल करुन योजनेला मंजुरी दिली जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.तसेच सुधारित नियमावलीला ही लवकरच मान्यता मिळेल आणि सर्व पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जातील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांना ९ महिने मुदतवाढ देण्याचे आदेश दिल्याचे ही ते म्हणाले.
अनेक विकसकांनी मनपा च्या ट्रांझिट कॅंप मधील रहिवाश्यांचे भाडे भरले नसून ही थकबाकी वसूल करावी अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली.तसेच ज्या ट्रांझिट कॅंप मधे सोसायटी रजिस्टर झाली आहे तेथे देखभाल खर्च दिला जात नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे याकडेही संदीप खर्डेकर यांनी लक्ष वेधले.
झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागणे हे स्मार्ट सिटी साठी अत्यंत महत्त्वाचे असून आपण सातत्याने याचा पाठपुरावा करणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केल.

Leave a Reply

%d bloggers like this: